महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'स्टंटमन' यांना मदत करण्याचे विद्युत जामवालने केले आवाहन - #गुडविलफॉरगुड

सध्या लॉकडाऊननंतर सिनेमांची शूटिंग पूर्ववत झालेली नाहीत. त्यामुळे स्टंटमन म्हणून काम करणाऱ्या हजारो तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीला अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवाल धावून आला आहे. त्याने इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Vidyut Jammwal
विद्युत जामवाल

By

Published : Aug 13, 2020, 8:28 PM IST

मुंबई:अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवाल याने मूव्ही स्टंट आर्टिस्ट असोसिएशनच्या स्टंटमॅनला मदत करण्यासाठी देणगी दिली आहे.

लॉकडाऊन दरम्यान चित्रपट उद्योग बंद पडल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून उत्पन्न नसलेल्या या व्यावसायिकांना आर्थिक मदतीसाठी मदत करण्याचे विद्युतने आवाहनही केले आहे.

सध्या लॉकडाऊननंतर सिनेमांची शूटिंग पूर्ववत झालेली नाहीत. त्यामुळे स्टंटमन म्हणून काम करणाऱ्या हजारो तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना कोणत्याही स्वरुपात मोबदला मिळणे बंद झाले आहे. हे समजताच विद्युत जामवाल हा "स्क्रीन वॉरियर्स" या व्यवस्थापन करणार्‍या संस्थेच्या संपर्कात आला. त्याने त्यांना उद्देशून पत्र लिहून देणगी दिली आहे.

"आमच्या स्टंट कलाकारांना आपल्या पाठिंब्याची आवश्यकता आहे आणि ज्यांना मदत करायची आहे त्यांनी कृपया पुढे यावे. ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, विशेषतः माझ्या सहकाऱ्यांनी देणगी द्यावी, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुकर होईल. आम्हाला चांगल्या जगासाठी स्वतःचे औदार्य पाळण्याची गरज आहे." असे विद्युतने म्हटले आहे.

यापूर्वी त्याने उद्योजकांच्या सबलीकरणासाठी फायदेशीर काम करणाऱ्या #गुडविलफॉरगुड या उपक्रमालाही सुरुवात केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details