अभिनेत्री विद्या बालन ने नेहमीच आपल्या भूमिका निवडीबाबत चोखंदळपणा दर्शविला आहे. 'द डर्टी पिक्चर' मधील सिल्क स्मिता असो किंवा 'कहानी' मधील विद्या बाघची भूमिका असो, तसेच, मागच्या वर्षीचा सिनेमा 'शकुंतला देवी' मधील गणितज्ञ-भूमिका असो किंवा 'तुम्हारी सुलू' मधील आरजे असो, या अष्टपैलू अभिनेत्रीने आपल्या प्रत्येक भूमिकेचे सोने केले आहे आणि सिनेमाप्रेमींना चकित करून, बॉलिवूड मध्ये स्वतःसाठी एक वेगळे स्थान बनविले आहे.
‘शेरनी’ च्या निर्मात्यांना तिचे हेच गुण आवडले होते आणि त्यांनी सर्वप्रथम तिलाच ‘शेरनी’ चे कथानक ऐकविले होते. ‘अभिनयातील अष्टपैलुत्व आणि अपारंपरिक भूमिकांची निवड यामुळे विद्या बालन ‘शेरनी’ साठी पहिली पसंती होती. तिच्या अपारंपरिक भूमिकांच्या निवडीमुळेच ती ह्या चित्रपटासाठी सर्वोत्तम आहे’ असे ते छातीठोकपणे सांगतात. महत्वाचं म्हणजे भूमिकांबाबत इतका चोखंदळपणा दाखविणारी ती पहिलीच अभिनेत्री असावी असेही ते सांगतात.
विद्याचे अष्टपैलुत्व, भावनिक कलाकुसर, भूमिकेतील तिचे समर्पण आणि तिने केलेल्या प्रत्येक भूमिकेबद्दलची तिची आस्था आणि आपलेपणा, या कारणांमुळेच, निर्माते भूषण कुमार आणि विक्रम मल्होत्रा यांनी बहूपुरस्कार विजेते दिग्दर्शक अमित मसुरकर यांच्या ‘शेरनी’ चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी तिची बिनदिक्कत निवड केली. मानव-प्राण्यांच्या संघर्षावर आधारित या चित्रपटात, हिंदी चित्रपटसृष्टीत प्रथमच वन अधिकाऱ्याची भूमिकेत विद्या दिसणार आहे. या चित्रपटाचा अंतिम कट पाहून निर्माते त्यांच्या निवडीबाबत गर्वित झाले आहेत. त्यांच्या मते विद्याने यात बहु-स्तरीय व्यक्तिरेखा साकारली आहे जी अत्यंत कठीण पण भेद्य आहे, निर्भय असूनही नरम आहे.