मुंबई - जोकर म्हटलं की सर्वात आधी आठवण येते ती म्हणजे राज कपूर यांनी 'जोकर' चित्रपटात साकारलेल्या जोकारच्या भूमिकेची. हा चित्रपट राज कपूर यांच्या करीअर मधील दमदार भूमिकांपैकी एक होता. त्यांची जोकरच्या वेशातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अभिनेत्री विद्या बालनने सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती जोकरच्या भूमिकेत पाहायला मिळते.
जोकरच्या वेशात असलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? शेअर केला जुना व्हिडिओ - vidya balan latest instagram post
सध्या कोरोना विषाणूमुळे देशात लॉक डाऊन सुरु आहे. या लॉक डाऊनच्या काळात सेलिब्रिटीही घरात बसून आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट शेअर करत असतात.

विद्याचा हा जुना व्हिडिओ आहे. या व्हिडिओद्वारे तिने राज कपूर यांना आदरांजली वाहिली होती. त्यांच्या भूमिकेसारखी वेशभूषा करून तिने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओवर तिने 'जीना यहा मरना याहा, इसके सिवा जाना कहा..', या चित्रपटातील गाण्याच्या ओळी लिहल्या आहेत.
सध्या कोरोना विषाणूमुळे देशात लॉक डाऊन सुरु आहे. या लॉक डाऊनच्या काळात सेलिब्रिटी देखील घरात बसून आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. त्यामुळे विद्या बालनने शेअर केलेल्या व्हिडीओ ची सध्या चर्चा आहे.