मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवालला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. १२ वर्षापूर्वी झालेल्या मारहाणीच्या आरोपातून तो मुक्त झालाय. त्याला वर्षांपूर्वी एका व्यावसायिकावर क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्याच्या आरोपाखाली बांद्रा न्यायायलयाने सबळ पुराव्याअभ्यावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मारहाणीच्या गुन्ह्यात विद्युत जामवाल निर्दोष
प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता विद्युत जामवाल याला १२ वर्षांपूर्वी एका व्यावसायिकावर क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्याच्या आरोपाखाली बांद्रा न्यायायलयाने सबळ पुराव्याअभ्यावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सप्टेंबर 2007 मधली ही घटना असून मुंबईतील ग्रँट हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये एक स्थानिक व्यावसायिक राहुल सूरी याच्या डोक्यात विद्युत जामवाल व त्याच्या एका सहकाऱ्याने काचेची बाटली फोडून त्यास जखमी केल्याची घटना घडली होती.
या प्रकरणात पोलिसांनी विदुयत जामवाल त्याचा मित्र हरिषणाथ गोस्वामी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात मुंबईतील बांद्रा कोर्टात सुनावणी सुरू होती. सोमवारच्या सुनावणीस विद्युत जामवाल व त्याचा मित्र हजर होते. सबळ पुराव्या अभावी विद्युत जामवाल व त्याचा मित्र हरिषणाथ गोस्वामी या दोघांची सुटका केली आहे.