मुंबई- बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित सर्वच भारतीयांच्या दृष्टीने उत्कृष्ठ डान्सर आहे. तिचे डान्स व्हिडिओ नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. सध्या ती 'डान्स दिवाने' हा डान्स रिएलिटी शो जज करीत आहे. या शोमधील तिचे व्हिडिओ अधून मधून व्हायरल होत असतात. अलीकडेच या शोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने भाग घेतला. शो दरम्यान माधुरी दीक्षित आणि रवीना टंडन यांची जुगलबंदीही प्रेक्षकांनी पाहिली. या दोन्ही अभिनेत्रींनी एकाच मंचावर उत्तम नृत्य आणि परफॉर्मन्सने चाहत्यांची मने जिंकली.
माधुरी दीक्षितने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये ती आणि रवीना टंडन डान्स करताना दिसत आहेत. माधुरीने शेअर केलेला व्हिडिओ दीड लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. चाहत्यांसह सेलेब्रिटीजही यावर बरीच प्रतिक्रिया देत आहेत.