महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटात विकी कौशल आणि मानुषी छिल्लरची जोडी - Vicky Kaushal latest news

यश राज फिल्म्सच्या आगामी चित्रपटात विकी कौशल आणि मानुषी छिल्लर स्क्रीन स्पेस शेअर करण्यास तयार आहेत. यशराज फिल्म्सचा हा ५० वा चित्रपट खास असणार आहे.

Vicky Kaushal
विकी कौशल आणि मानुषी छिल्लर

By

Published : Mar 1, 2021, 5:05 PM IST

मुंबई- राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता विकी कौशल आणि मिस इंडिया २०१७ विजेती मानुषी छिल्लर ही जोडी यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. यशराज फिल्म्सचा हा ५० वा चित्रपट खास असणार आहे.

विकी आणि मानुषीच्या या नव्या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. या चित्रपटातील कास्टिंग आणि कॉमेड्री ड्रामाचे जॉनर या व्यतिरिक्त इतर तपशील अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.

रिपोर्ट्सनुसार, निर्माते विक्की-मानुषीच्या चित्रपटाला 'द ग्रेट इंडियन फॅमिली' किंवा टीजीआयएफ म्हणत आहेत. विनोदी धाटणीच्या चित्रपटात विकी कौशल पहिल्यांदाच काम करीत आहे. कुटंबाभोवती फिरणारी जर कथा असेल तर चित्रपटाला 'द ग्रेट इंडियन फॅमिली' किंवा टीजीआयएफ हे शीर्षक योग्य वाटते.

विकी कौशल हे नाव 'मसान' आणि 'उरी'मुळे घराघरापर्यंत पोहोचले आहे. त्याचे फॅन फॉलोअर्सही प्रचंड आहेत. मानुषी छिल्लरने २०१७ मध्ये मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर तिच्या बॉलिवूड प्रवेशाची चर्चा सुरू होती. 'पृथ्वीराज' या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

हेही वाचा - जॅकलिन फर्नांडिज आणि अक्षय कुमार यांच्यात काय साम्य आहे?

ABOUT THE AUTHOR

...view details