मुंबई- अभिनेता विकी कौशल आजकाल चित्रपटांसोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत आहे. नुकताच विकी आणि कॅटरिना कैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. दुसरीकडे, नुकताच प्रदर्शित झालेला 'सरदार उधम' चित्रपट प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळवत आहे. विकी कौशलने देशाचे महान क्रांतिकारक आणि शूर सरदार उधर सिंह यांची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, विकी कौशलने त्याच्या पात्राचा लुक शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या पाठीवर क्लेशदायक खुणा दिसत आहेत.
विकी कौशलने कॅमेऱ्याला पाठ दाखवत एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या पाठीवर असंख्य वार दिसत आहेत. यापैकी काही जखमा जुन्या असल्यासारखे दिसतात आणि बऱ्या झाल्या आहेत तर काही जखमा अगदी ताज्या दिसतात. पाठीवरच्या या खुणा कदाचित निर्मात्यांनी कलात्मकतेने बनवल्या असल्या तरी कमकुवत अंतःकरण असलेले लोक हे पाहून अस्वस्थ होऊ शकतात.
विकी कौशलच्या या फोटोवर सोशल मीडिया युजर्स विविध प्रकारे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले - सर तुम्ही हे कसे केले? तर एकजण म्हणाला, तुम्ही मूर्खासारखे दिसत आहात. दुसऱ्या एका युजरने लिहिले - कॅटरिना दुःखी होईल.