मुंबई- अभिनेता विकी कौशलने 'संजू', 'मसान', 'मनमर्जिया' आणि 'राजी'सारख्या चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. यानंतर आलेल्या 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' या सिनेमाने विकीचं फिल्मी करिअर यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद तर मिळालाच याशिवाय बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं धमाकेदार कमाई केली. यानंतर नुकतंच जाहीर करण्यात आलेल्या ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातही या चित्रपटाच्या नावाचा समावेश झाला.
'उरी'साठी मिळालेल्या पुरस्कारावर विकी म्हणतो, माझ्यासाठी हा चालना देणारा क्षण
माझ्या कामासाठी मला मिळालेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हृदयस्पर्शी आणि चालना देणारा क्षण आहे. मी सर्व ज्यूरींचे आभार मानेल उरीमधील माझ्या कामासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल, असं विकी म्हणाला.
या सिनेमातील आपल्या उत्तम अभिनयासाठी अभिनेता विकी कौशल याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर विकीनं एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यानं म्हटलं आहे, की कदाचित शब्दही कमी पडतील सध्या मला होत असलेला आनंद आणि भावना व्यक्त करताना. माझ्या कामासाठी मला मिळालेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हृदयस्पर्शी आणि चालना देणारा क्षण आहे. मी सर्व ज्यूरींचे आभार मानेल उरीमधील माझ्या कामासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल.
यासोबतच हा पुरस्कार अशा व्यक्तीसोबत शेअर करताना मला अतिशय आनंद होत आहे. ज्याचं एक माणूस आणि अभिनेता म्हणून मला नेहमीच कौतुक वाटतं, असं म्हणत विकीने आयुष्मानचं अभिनंदन केलं आहे. विकीसोबतच आयुष्मानलाही बधाई हो'साठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुढे विकी म्हणाला, हा पुरस्कार मला माझ्या कुटुंबीयांना उरीच्या संपूर्ण टीमला, देशाला आणि देशासाठी आपल्या प्राणांची अहुती देणाऱ्या जवानांना समर्पित करण्याची इच्छा आहे.