हैदराबाद - १९७५ मध्ये रिलीज झालेल्या 'चुपके चुपके' चित्रपटाचा रिमेक दिग्दर्शक लव्ह रंजन करणार आहेत. या चित्रपटात राजकुमार राव धर्मेंद्रच्या भूमिकेत दिसणार आहे, तर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिनेता विक्की कौशल या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांनी साकारलेली भूमिका वठवणार असल्याची चर्चा आहे.
राजकुमार राव आणि विकी कौशल यांनी चुपके चुपके चित्रपटामध्ये स्क्रिन स्पेस शेअर केल्यास या रिमेकची उंची वाढू शकते. त्यामुळे निर्माता हा विचार करू शकतात. मात्र अद्यापही या बातमीला विकी कौशलकडून दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, त्यानंतर विक्की कौशल शूजित सरकार यांच्या आगामी सरदार उधम सिंगमध्ये दिसणार आहे. शिवाय एका चित्रपटात तो माजी ब्युटी क्वीन मानुषी छिल्लरबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करतानाही दिसणार आहे.