मुंबई 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'मधील आपल्या भूमिकेने लोकांची मने विकी कौशलने जिंकली होती. विकीने आपला काही वेळ भारतीय सैनिकांसोबत घालवला. यावेळी तो खूप आनंदित होता. विकीने जवांनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, अरुणाचल प्रदेशातील १४००० फूट उंचावरील भारत चीन सीमेवरील तवांग येथील सैनिकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आनंदित आहे.
भारतीय सैन्यासोबत विकी कौशलने अनुभवले आनंदाचे क्षण - Biopic
उरी चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकलेल्या विकी कौशलने भारतीय सैन्याची भेट घेतली. जवानांसोबतचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
![भारतीय सैन्यासोबत विकी कौशलने अनुभवले आनंदाचे क्षण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4008459-thumbnail-3x2-pp.jpg)
कामाच्या पातळीवर विचार करता विकी कौशलकडे करण जोहरचा मल्टीस्टारर चित्रपट 'तख्त', 'भूत पार्ट वन- द हॉन्टेड शिप' आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक चित्रपट आहे. हा बायोपिक मेघना गुलजार दिग्दर्शित करणार आहे. राजी या चित्रपटानंतरचा मेघनासोबत विकीचा हा दुसरा चित्रपट असेल. भारत पाक यांच्यात १९७१ मध्ये झालेल्या युध्दाच्यावेळी सॅम मानेकशॉ भारतीय सैन्य प्रमुख होते.
अलिकडेच झालेल्या मुलाखतीत माणेकशॉ यांच्यासारख्या नॅशनल हिरोची व्यक्तिरेखा साकारणे सन्मानाचे असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या लूकसाठी खूप मेहनत करावी लागणार असल्याचेही त्याने सांगितले. या चित्रपटाचे शूटींग २०२१ मध्ये सुरू होणार आहे.