मुंबई - उरी - द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातील भूमिकेमुळे विकी कौशल सिने जगतात चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटाच्या शूटींगच्यावेळी जोश कायम रहावा यासाठी टीमने कशी मेहनत घेतली याबद्दलची पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. उरी हा चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता.
विकीने एक फोटो शेअर करीत लिहिले आहे, "८ जून. बरोबर एक वर्षापूर्वी आम्ही उरीच्या शूटींगला सुरुवात केली होती. त्यानंतरचे वर्ष भन्नाट होते. आजपर्यंतच्या सर्वात उत्तम रोलर कोस्टर राईडचा मी अनुभव घेतला."