महाराष्ट्र

maharashtra

४ वर्षांपूर्वी आयुष्यानं मला धडा शिकवला, विकीची पोस्ट वाचून पडाल विचारात

विकीने वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरचा फोटो शेअर केला आहे. हा घाट दहनक्रियेसाठी ओळखला जातो. याच गोष्टीने मला आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा धडा शिकवला, असं म्हणत विकीने चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

By

Published : Jul 24, 2019, 7:22 PM IST

Published : Jul 24, 2019, 7:22 PM IST

विकीची पोस्ट वाचून पडाल विचारात

मुंबई- नीरज घायवन यांनी दिग्दर्शित केलेला ‘मसान’ चित्रपट चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात रिचा चढ्ढा, संजय मिश्रा, विकी कौशल, श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने विकीने खास पोस्ट शेअर केली आहे.

विकीने वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरचा फोटो शेअर केला आहे. हा घाट दहनक्रियेसाठी ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी आम्ही 'मसान' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती. यावेळी मी अनेक तास येथेच बसून एकामागोमाग अनेक मृतदेह जळताना पाहायचो. गोरे, काळे, सुंदर, कुरूप, श्रीमंत, गरीब, जाड, बारीक अशा सर्वच प्रकारच्या व्यक्तींच्या राखेचा रंग मात्र सारखाच असायचा. याच गोष्टीने मला आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा धडा शिकवला, असं म्हणत विकीने चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

दरम्यान 'मसान' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वांनीच विकीचं विशेष कौतुक केलं होतं. या सिनेमातूनच त्याने बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केलं आणि यासाठी त्याला सर्वोतकृष्ट पदार्पणीय अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्याने 'राजी', 'संजू', 'मनमर्जियां' आणि 'उरी'सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकत टॉप अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवलं.

ABOUT THE AUTHOR

...view details