मुंबई - अभिनेता विक्की कौशल हा माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरबरोबर यशराज फिल्म्स (वायआरएफ) निर्मित आगामी कॉमेडी चित्रपटासाठी एकत्र काम करीत आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी कलाकारांनी मंगळवारी सकाळी मध्य प्रदेशातील माहेश्वरला प्रयाण केले.
मंगळवारी सकाळी विकी आणि मानुषी इंदूरकडे जाणाऱ्या विमानात चढण्यापूर्वी मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यात कैद झाले. पुढील काही दिवस या टीमचे शूटिंग माहेश्वरमध्ये सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या टीमने मुंबईत यापूर्वी शुटींगला सुरुवात केली होती.
विक्की आणि मानुषीचे काही रोमँटिक सीन्स आणि माहेश्वरची अनोख्या पार्श्वभूमीवर सुंदर आणि आकर्षक ठरतील, असे एका वेबलोइडने अहवालात म्हटले आहे.