मुंबई -बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल आणि बार्बी डॉल म्हणून ओळखली जाणारी कतरिना कैफ यांच्या प्रेमप्रकरणाची गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. केवळ इतकेच नाही तर हे दोघेजण येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची माहिती आहे. कतरीना कैफ आणि विकी कौशल यांचा साखरपूडा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. दिग्दर्शक कबीर खानच्या घरी कतरीना-विकीचा साखरपुडा झाला असून आता लग्नाच्या तयारीला जोमाने सुरुवात झाली आहे. या सोहळ्याला फक्त दोघांकडील कुटुंबीय उपस्थित होते, अशी माहिती आहे.
कतरीनाची आई सुझान टर्कोएट, तिची बहीण इसाबेल कैफ, विकीचे आई-वडील शाम कौशल आणि वीणा कौशल आणि भाऊ सनी कौशल उपस्थित होते आणि अर्थातच कबीर खान आणि त्याची पत्नी मिनी माथूर यांच्या उपस्थितीत ‘रोका’ संपन्न झाला. कबीर खानने कतरीना कैफ सोबत एक था टायगर आणि न्यूयॉर्क या चित्रपटांत दिग्दर्शक-अभिनेत्री म्हणून काम केले आहे. खरंतर कतरीना कबीर खानला राखी बांधते. त्यामुळे आपल्या भावाच्या घरी तिने विकिसोबत रोका केला. पंजाबी समाजात साखरपुडा म्हणजे रोका. हा एक सोहळा आहे जो लग्नाआधी भावी जोडप्यामधील बंध दर्शवण्यासाठी आणि लग्नकरारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी केला जातो.