मुंबई - अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांची लग्नाची चर्चा टॉक ऑफ द टाऊन आहे. या हायप्रोफाईल लग्नाची आता लगीनघाई पाहायला मिळत आहेत. देश विदेशातून लग्नासाठी वऱ्हाडी मंडळी भारतात दाखल होत आहेत. विकी आणि कॅटरिना आज मुंबईहून राजस्थानातील सवाई माधोपूरला रवाना झाले.
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाला 120 पाहुणे हजेरी लावणार असून त्यात अनेक बॉलिवूड स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या लग्नाचे ठिकाण सवाई माधोपूरच्या चौथ का बरवाडा येथे हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट आहे, परंतु लग्नाचे ठिकाण शनिवारी म्हणजेच ४ डिसेंबरला कार्यक्रमापूर्वी ताब्यात घेण्यात आले. तेथील सर्व कर्मचाऱ्यांनाही बाहेर पाठवण्यात आले आहे.
कॅटरिनाची बहिण नताशाचे भारतात आगमन राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्टमध्ये लग्न पार पडणार
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 7 ते 12 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा चालणार असून लग्नासाठी हॉटेल बुकिंग आधीच झाले आहे. व्हीआयपी लग्नाचे आयोजन करण्यासाठी अनेक इव्हेंट कंपन्या एकत्र काम करतील. हॉटेल व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीमने लग्नाशी संबंधित सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवले आहे. मिरवणुकीच्या आगमनापासून मेहंदी, हळदीकुंकूपर्यंतच्या सजावटीची व्यवस्था या पथकाने पाहिली. मात्र, लग्नाचे कार्यक्रम अद्याप जाहीर झालेले नाहीत.
बुलेट प्रूफ स्टाईलमध्ये होणार विवाह
कॅटरिना आणि विकी कौशल यांचे लग्न बुलेट प्रूफ स्टाईलमध्ये होणार आहे. तेथे पाहुण्यांना फोन वापरायला परवानगी नाही आणि ड्रोनवरही रेकॉर्डिंग करता येणार नाही. इथे दाखल होणाऱ्या पाहुण्यांचेही पूर्ण लसीकरण केले जाईल, त्याशिवाय त्यांना प्रवेशही मिळणार नाही.मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील व्यवस्थापन पथक शनिवारी घटनास्थळी पोहोचले. तेथील सर्व कर्मचाऱ्यांना हॉटेलबाहेर काढण्यात आले. लग्न होईपर्यंत हे कर्मचारी येथे काम करणार नसल्याचे सांगितले जात आहे. आता तिथे कोण काम करणार, असा प्रश्न निर्माण तुमच्या मनात आला असेल. तर, व्यवस्थापन टीमने हॉटेलमध्ये आपले स्वयंसेवक तैनात केले आहेत.ते स्वयंसेवकच आता 10 डिसेंबरपर्यंत काम करतील. इव्हेन्ट मॅनेजमेंटच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रम संपेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला हॉटेलमध्ये प्रवेश मिलणार नाही. लग्नात येणाऱ्या 120 पाहुण्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाईल. लग्नातील व्हिडिओ आणि फोटोसाठी आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार मारिया टेस्टिनोला नेमण्यात आले आहे. सवाई माधोपूरचे पोलीस प्रशासनही सतर्क आहे. सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस दलही सक्रिय आहे.
मेहंदी तिच्या खास वैशिष्ट्यासाठी जगभर प्रसिद्ध -
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी कॅटरिना कैफच्या हातावर लागणारी मेहंदी खूप खास असेल. ही मेहंदी कॅटरिना कैफने पाली (राजस्थान) येथून मागवली आहे. राजस्थानच्या सोजत जिल्ह्यातील मेहंदीला हेना म्हणून ओळखले जाते आणि त्याची चमक खूप खास आहे. ही मेहंदी तिच्या खास वैशिष्ट्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. कॅटरिना कैफसाठी सोजतचे कारागीर स्वतःच्या हातांनी मेहंदी तयार करत आहेत. त्यात कोणतेही रसायन असणार नाही. कॅटरिनाला मेहंदीचा नमुना पाठवण्यात आला होता, जो तिने पास केला आहे. या मेहंदीची किंमत 50 हजार ते 1 लाख रुपये इतकी आहे. मात्र, या बातमीबाबत विकी आणि कॅटरिनाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
हेही वाचा - लग्नाळू सेलेब्रिटी!! विवाह झालेले आणि विवाहेच्छूक सेलेब्रिटी जोड्या