मुंबई (महाराष्ट्र) - विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाची (Vicky-Katrina wedding) जोरदार चर्चा सुरु असल्याने मुंबई आणि जयपूर विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथील शाही लग्नाला उपस्थित राहणार असलेल्या सेलिब्रिटींची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचे दृष्य पाहायला मिळाले.
मंगळवारी सकाळी, कॅटरिनाचा जवळचा मित्र आणि चित्रपट निर्माता कबीर खान लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जयपूरला रवाना झाला. त्याची पत्नी मिनी माथूर आणि मुलगी सायरासोबत मुंबई विमानतळावर पोहोचतानाचे त्याचे अनेक फोटो इंटरनेटवर झळकले आहेत.
कॅटरिनाने कबीरसोबत न्यूयॉर्क, एक था टायगर आणि फँटम सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.