महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

vicky katrina wedding video leaked : कडेकोट बंदोबस्तात असतानाही, विकी कॅटरिनाच्या विवाहस्थळावरील व्हिडिओ लीक - Vicky Katrina wedding

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ त्यांच्या लग्नाचे (Vicky Kaushal and Katrina Kaif's wedding) क्षण मीडियापासून लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी विवाहस्थळाच्या आतील एक व्हिडिओ मात्र ऑनलाइन समोर आला आहे.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ
विकी कौशल आणि कॅटरिना कैफ

By

Published : Dec 7, 2021, 6:52 PM IST

हैदराबाद (तेलंगणा)- बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाच्या बातम्यांनी (Vicky Kaushal and Katrina Kaif wedding) वेबलॉइड्स आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. VicKat हॅशटॅग ट्रेंडमध्ये (VicKat hashtag) वरच्या स्थानी आला आहे. दोघांचेही चाहते पती पत्नी म्हणून दोघांची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. लग्नाच्या ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आले असूनही, सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस किल्ल्यावरील एका व्हिडिओने सोशल मीडियावर चर्चेला उधान आले आहे.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याने डेटिंग आणि त्यानंतरच्या लग्नाच्या बातम्यांवर भाष्य करणे टाळले होते. त्यामुळे विकॅटच्या नात्याबद्दलच्या संदिग्धतेमुळे उत्सुकता वाढली आहे.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ त्यांच्या लग्नाचे क्षण मीडियापासून लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी विवाहस्थळाच्या आतील एक व्हिडिओ मात्र ऑनलाइन समोर आला आहे. आपण त्याला व्हिडिओ व्हायरल झालाय असे म्हणू शकतो.

विकी-कॅटरिनाच्या विवाहस्थळावरील एक व्हिडिओ लीक झालेला आहे. यात कलाकार जोधा अकबरमधील ख्वाजा मेरे ख्वाजा या भावपूर्ण सूफी गाण्यावर नाचत आहेत. सिक्स सेन्स फोर्ट विकॅटच्या लग्नासाठी उजळला जात असताना तो किती मंत्रमुग्ध करणारा दिसतो याची झलकही व्हिडिओमध्ये दिसली आहे.

मंगळवारी रात्री या जोडप्याचा संगीत समारंभ होईल, त्यानंतर बुधवारी हळदी समारंभ होईल, त्यानंतर 9 डिसेंबरला विवाहाच्या सेहराबंदी सारखे कार्यक्रम नियोजित असतील. गुरुवारी दुपारी ३ वाजता हे जोडपे फेरे घेतील आणि त्यानंतर रात्री डिनर आणि पूलसाइड पार्टी होईल.

विकी आणि कॅटरिना १२ डिसेंबरपर्यंत बरवारा किल्ल्यावर राहणार आहेत. लग्नानंतर दोघेही चौथ मातेच्या मंदिरात जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Vicky Katrina Wedding : विकी कॅटरिनाच्या विवाहाच्या फुटेजसाठी Ott प्लॅटफॉर्मद्वारे 100 कोटींची ऑफर? 'निक्यंका'चाही मोडणार विक्रम?

ABOUT THE AUTHOR

...view details