मुंबई- कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला सहा दिवस उलटले आहेत. हे जोडपे हनीमूनहूनही परतले असून आता या जोडप्याचे लग्नाचे रिसेप्शन कधी होणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या लग्नाच्या रिसेप्शनची तारीख समोर आली आहे. हे जोडपे कोरोना विषाणूच्या नवीन प्रकार ओमायक्रॉनशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत.
सलमान-रणबीरला निमंत्रण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना कैफ आणि विकी कौशल राजस्थानमध्ये शाही लग्नानंतर फिल्मी जगतातील सेलिब्रिटी आणि त्यांच्या नातेवाईकांना वेडिंग रिसेप्शन देण्याची तयारी करत आहेत. लग्नाच्या रिसेप्शनसाठी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान आणि रणबीर कपूरसह अनेक चित्रपटसृष्टीतील व्यक्तींच्या घरी लग्नाच्या रिसेप्शनचे आमंत्रण पोहोचले आहे.
या दिवशी होणार लग्नाचे रिसेप्शन
आघाडीच्या वत्तसंस्थेच्या बातमीनुसार, कॅटरिना कैफ आणि विकी कौशलला लग्नाशी संबंधित सर्व कार्यक्रम संपवून कामावर परतायचे आहे. म्हणूनच हे जोडपे ख्रिसमसच्या आसपास म्हणजेच २० डिसेंबरला लग्नाचं भव्य रिसेप्शन देणार आहे. कॅटरिना-विकी मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहेत. यानंतर या जोडप्याचे कुटुंब ख्रिसमस उत्साहात साजरा करणार आहे.