पुणे- ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी (दि. 19 डिसें) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
आद्य नटसम्राट हरपला, ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे निधन
श्रीराम लागू यांना लहानपणापासूनच नाट्याचे छंद होते. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेत नाट्याचा छंदही जोपासला होता. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते 'ईएनटी' म्हणजेच कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर बनले. पण, नाट्याच्या छंदाने ते अभिनय क्षेत्रात आकर्षिले गेले आणि त्यांनी वयाच्या 42 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता.
Last Updated : Dec 18, 2019, 1:36 AM IST