- कन्या रिधीमा कपूर दिल्लीवरून विशेष विमानाने मुंबईला येण्यास निघाली होती. मात्र, शेवटच्या क्षणाला भारत सरकारने परवानगी नाकारली. अभिनेते ऋषी कपूर रुग्णालयात दाखल
- रणबीर कपूर, नितू सिंग,रणधीर कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, करिष्मा कपूर, अरमान जैन, आलिया भट्ट अभिषेक बच्चन, आदर जैन, अयान मुखर्जी आणि अनिल अंबानी अंत्यविधीसाठी उपस्थित होते. या १२ जणांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
- पार्थिव गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत आणण्यास येत आहे
- बंधू रणधीर कपूरसह करीना कपूर, सैफ अली खान, आलीया भट्ट चंदनवाडी स्मशानभूमीत आले आहेत.
- कन्या रिधीमा सहानी दिल्लीवरून विशेष विमानाने मुंबईला अंत्यविधीसाठी येणार आहेत.
- ऋषी कपूर यांच्यावर गिरगावातील चंदनवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ऋषी कपूर यांच्या निधनांनतर दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केल्या भावना
मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे. ते ६७ वर्षाचे होते. या बातमीची माहिती खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर दिली आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील एनएच रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रणधीर कपूर यांनी या बातमीला दुजोरा दिला होता. तसेच, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील आज एक ट्विट करुन त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
ऋषी कपूर मागील वर्षी लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेऊन भारतात परतले होते. कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर वर्षभर ते न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होते. या काळात त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी त्यांच्यासोबत राहून त्यांची काळजी घेतली. साधारण वर्षभर उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये ऋषी कपूर भारतात परतले होते.