मुंबई - ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर संध्याकाळी मुंबईतील ५ च्या सुमारास सांताक्रूझ स्मशानभूमीत दफनविधीचे संस्कार पार पडले. त्यापूर्वी शासनाच्या वतीने त्यांना अखेरचा सलाम करण्यात आला. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. शासकीय इतमामात पार पडलेल्या या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह मोजकेच लोक स्मशानात हजर होते.
ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात दफनविधी
ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतील स्मशानभूमीत दफनविधी पार पडले. त्यापूर्वी शासनाच्या वतीने त्यांना अखेरचा सलाम करण्यात आला. शासकीय इतमामात पार पडलेल्या या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह मोजकेच लोक स्मशानात हजर होते.
दिलीपकुमार यांची पत्नी सायरा बानोदेखील स्मशानभूमीत उपस्थित होत्या. अत्यंत दुःखद वातावरणात त्यांनी पतीला अखेरचा निरोप दिला.
गेल्या काही दिवसापासून दिलीप कुमार आजारी होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार होत होते. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसापूर्वीच त्यांना उपचारानंतर प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. पणकाही दिवसांनी पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने इस्पितळात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यानच अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.