महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'वीरे दी वेडिंग'ला १ वर्ष पूर्ण; सोनम म्हणते, आयुष्यभरासाठी खास मैत्रिणी कमवल्या - one year

चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोनमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटाने मला आयुष्यभरासाठी खास मैत्रिणी दिल्या असल्याचं सोनमनं म्हटलं आहे.

'वीरे दी वेडिंग'ला १ वर्ष पूर्ण

By

Published : Jun 1, 2019, 7:26 PM IST

मुंबई- २०१८ मध्ये आलेल्या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. करिना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे हा सिनेमा वादातही राहिला. मात्र, यातील अभिनेत्रींच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले.

चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोनमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटाने मला आयुष्यभरासाठी खास मैत्रिणी दिल्या असल्याचं सोनमनं म्हटलं आहे. या चित्रपटासाठी तिनं रिया कपूरचे आभार मानले आहेत. तर एकता कपूर एक उत्तम महिला बॉस असून ती सर्व महिलांसाठी प्रेरणा असल्याचं सोनमनं म्हटलं आहे.

'वीरे दी वेडिंग'ला १ वर्ष पूर्ण

यासोबतच शशांक घोष यांनी नेहमीच माझ्यातील एका उत्तम अभिनेत्रीला जागं केलं. त्यांच्यासोबत आणखी काही चित्रपट साईन करण्यासाठी उत्सुक असल्याचं तिनं म्हटलं आहे. लवकरच या चित्रपटाचा सिक्वलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. मात्र, याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details