मुंबई- 'स्टूडंट ऑफ द ईअर' या २०१३ मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच 'स्टूडंट ऑफ द ईअर २' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. अशात आता यावर अभिनेता वरूण धवनची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
'स्टूडंट ऑफ द ईअर २'चा ट्रेलर पाहून वरूण म्हणाला... - student of the year 2
वरूणने या चित्रपटाच्या पहिल्या भागात भूमिका साकारली होती. तर आता दुसऱ्या भागासाठी टायगर श्रॉफची वर्णी लागली आहे
वरूणने या चित्रपटाच्या पहिल्या भागात भूमिका साकारली होती. तर आता दुसऱ्या भागासाठी टायगर श्रॉफची वर्णी लागली आहे. या ट्रेलरबद्दल बोलताना वरूण म्हणतो, बॉलिवूडच्या नव्या स्टूडंटचं अभिनंदन. कोणत्याही चित्रपटाचा सिक्वल बनवणं ही सोपी गोष्ट नसते. पुनित तू यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि तुझी हीच मेहनत आता जगासमोर येणार आहे, असे म्हणत वरूणने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
चित्रपटात टायगर श्रॉफशिवाय तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या अभिनेत्रींच्याही मुख्य भूमिका आहेत. दोन्ही अभिनेत्री या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळे, चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान मे महिन्यात १० तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.