मुंबई- बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आपल्या पहिल्या चित्रपटापासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. एक-दोन अपवाद वगळता त्याच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अशात आता वरूण आपल्याच वडिलांचं म्हणजेच डेविड धवन यांचं दिग्दर्शन असलेल्या कुली नंबर १च्या रिमेकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
माझा १ नंबर डायरेक्टर, वरूणनं डेविड धवन यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - जुडवा
सिनेमाच्या सेटवरील डेविड यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत वरूणने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये वरूण धवन म्हटला, हॅपी बर्थडे पापा, माझे नंबर १ दिग्दर्शक..
![माझा १ नंबर डायरेक्टर, वरूणनं डेविड धवन यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4153508-thumbnail-3x2-varun.jpg)
वरूणनं डेविड धवनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
याच सिनेमाच्या सेटवरील डेविड यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत वरूणने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये वरूण धवन म्हटला, हॅपी बर्थडे पापा, माझे नंबर १ दिग्दर्शक..काम चालू हैं भाई लोग...कुली नंबर १
दरम्यान कुली नंबर १च्या रिमेकमध्ये वरूणशिवाय सारा अली खानदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा १९९५ मध्ये आलेल्या कुली नंबर १ सिनेमाचा रिमेक असणार आहे. डेविड धवन आणि वरूणने याधीही जुडवा सिनेमाच्या रिमेकसाठीही एकत्र काम केले आहे.