मुंबई- वरुण धवनचा 'कुली नं. १' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटातील नवीन गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. वरुणही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करीत असून त्याने आता 'मम्मी कसम' या त्याच्या 'कुली नं. १' चित्रपटातील गाण्याचा पडद्यामागल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडिओ क्लिपमध्ये डान्सर्सचा मोठा ताफा दिसत असून 'मम्मी कसम' या गाण्यावर वरुण धवन चक्क गाड्यांच्या टप्पावर थिरकताना दिसतो. या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य याने केली आहे. इन्स्टाग्रामवरील हा व्हिडिओ वरुणच्या चाहत्यांना पसंत पडला आहे.
प्रभुदेवांनी ‘उर्वशी उर्वशी’ मध्ये नाचताना पाहिले असल्याने आपल्याला नेहमीच असा डान्स नंबर करायचा असतो, असेही या अभिनेत्याने सांगितले. हे गाणे इतक्या चांगल्या प्रकारे काढल्याबद्दल वरुणने निर्माता जॅकी भगनानी, कलाकार आणि क्रू सदस्यांचे आभारही मानले.
"मास मसाला - जेव्हा मी उर्वशी उर्वशी गाण्यामध्ये प्रभुदेवांनी नृत्य केल्याचे पाहिले तेव्हापासून मी नेहमीच असे शॉट घेण्याचे स्वप्न पाहिले आहे. गणेश मास्टर आणि टीमचे मी खूप आभारी आहे. जॅकी भगनानी तुमचे आभार. कारण तुम्ही खरोखर 'निर्माता नंबर १' आहात. मी जेव्हा या गाण्याची ट्यून पहिल्यांदा ऐकली तेव्हा हे मासचे गाणे धमाकेदार आहे याची खात्री पटली होती.'', असे वरुणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
हेही वाचा - दीपिका अभिनीत 'द इंटर्न'च्या रिमेकसाठी ऋषी कपूर यांच्या जागी अभिनेत्याचा शोध जारी
'कुली नं. १' या चित्रपटाची निर्मिती बासू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी केली आहे. याचा खास प्रीमियर २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या संध्याकाळी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर होईल. हा चित्रपट प्राइमच्या माध्यमातून जगभरातील २०० देशांमध्ये व प्रदेशात प्रदर्शित होईल.
हेही वाचा - अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'कुली नंबर 1'चा ट्रेलर रिलीज