मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने आपला लहानपणीचा आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने काळजाला भिडणारी एक कविताही लिहिली आहे. ती कविता इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, मी आणि कशा प्रकारे एकत्र होतो, याबाबतची माहिती दिली आहे.
या फोटोला अनेकांनी कॉमेंट दिल्या आहेत. यात आदिती राव हैदरी, दिया मिर्झा आणि मनीष मल्होत्रा यांचा समावेश आहे.
दिया हिने लिहिलंय, लाली आंटी तर प्रेम आहेत. तर मनीष आणि आदिती राव हैदरी यांनी स्माईल करणारी इमोजी पोस्ट केली आहे.