मुंबई- बॉलिवूड अभिनेता वरूण धवनचा आज ३२ वा वाढदिवस आहे. दिग्दर्शक डेविड धवन यांचा मुलगा असलेल्या वरूणने २०१२ मध्ये 'स्टुडंट ऑफ द ईअर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वरूणचा हा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.
B'day Spl : 'स्टुडंट ऑफ द ईअर' ते 'कलंक' वरूणचे सर्वच चित्रपट ठरले सुपरहिट - kalank
२०१८ मध्ये आलेला 'ऑक्टोबर' चित्रपट वरूणच्या आतापर्यंतचा करिअरमधला पहिला फ्लॉप चित्रपट ठरला. परंतु, याचा त्याच्या करिअरवर जराही फरक पडला नाही.
२०१४ मध्ये वरूणने 'मैं तेरा हिरो' आणि 'हंम्टी शर्मा की दुल्हनिया' चित्रपटात भूमिका साकारल्या हे चित्रपटही पहिल्या चित्रपटाप्रमाणेच सुपरहिट ठरले. यापाठोपाठ 'बदलापूर', 'एबीसीडी २', 'दिलवाले', 'ढिशूम', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'जुडवा २' सारख्या चित्रपटात त्याने काम केले. विशेष म्हणजे वरूणच्या या सर्वच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर घसघशीत यश मिळाले.
२०१८ मध्ये आलेला 'ऑक्टोबर' चित्रपट वरूणच्या आतापर्यंतचा करिअरमधला पहिला फ्लॉप चित्रपट ठरला. परंतु, याचा त्याच्या करिअरवर जराही फरक पडला नाही. नुकताच वरूण 'कलंक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईदेखील केली. तर आज वरूणच्या वाढदिवशी त्याच्या आगामी चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट 'कुली नंबर १'चा सिक्वल असणार असून डेविड धवन याचं दिग्दर्शन करणार आहेत.