महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वरुण धवन दिसला धोती-कुर्त्यात, सर्वांना आवडला पेहराव! - varun-dhawan latest news

वरुण धवनला मराठमोळ्या ‘सकाळ सन्मान २०२१’ च्या अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले तेव्हा तो धोती-कुर्ता घालून आला होता. सर्वांना तो पेहराव खूपच आवडला. वरुणने या कार्यक्रमाला येताना घातलेला पेहराव संपूर्णतः उचित होता असे रवींद्रच्या प्रांगणात कुजबुजले जात होते.

वरुण धवन दिसला धोती-कुर्त्यात, सर्वांना आवडला पेहराव!
वरुण धवन दिसला धोती-कुर्त्यात, सर्वांना आवडला पेहराव!

By

Published : Feb 1, 2021, 10:56 AM IST

मुंबई -नवीन लग्न झालेला वरुण धवन नेहमीच न्यूजमध्ये असतो. नेहमी प्रसन्न राहणारा वरुण निरनिराळ्या फॅशन्सशी खेळत असतो. कुठलाही पेहराव तो उत्तमपणे ‘कॅरी’ करू शकतो. आता हेच पहा ना! त्याला मराठमोळ्या ‘सकाळ सन्मान २०२१’ च्या अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले तेव्हा तो धोती-कुर्ता घालून आला होता. सर्वांना तो पेहराव खूपच आवडला. वरुणने या कार्यक्रमाला येताना घातलेला पेहराव संपूर्णतः उचित होता असे रवींद्रच्या प्रांगणात कुजबुजले जात होते.

वरुण धवन दिसला धोती-कुर्त्यात
गेल्या वर्षी झालेल्या कोरोना व्हायरस-लॉकडाऊन दरम्यान मानवतावादी प्रयत्नांसाठी बॉलिवूडमधील उमदा कलाकार वरुण धवनचा गौरव करण्यात आला. हा सोहळा रवींद्र नाट्यमंदिरामध्ये रंगला व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्री, प्रतिष्ठित राजकारणी व इतर क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते. कोरोना काळात मदतगेल्या वर्षी कोरोना महामारीच्या संकटात संपूर्ण जगासह आपला देशही भरडला गेला. कोरोनाने असंख्य लोकांचे बळी घेतले तसेच अनेकांचा रोजगार बुडाला. अशावेळी सामाजिक बांधिलकी जपत काही जणांनी सढळ हस्ते मदत केली ज्यात अभिनेता वरुण धवन सुद्धा होता. त्याने पंतप्रधान मोदींनी स्थापन केलेल्या ‘पीएम-केयर्स’ निधीसाठी ३० लाख रुपयांची देणगी दिली. तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये दोन लाख रुपयांची मदत दिली. लॉकडाऊन काळात, कोरोना योद्धे व आरोग्य कर्मचाऱ्यांची, त्याने मोफत भोजन व्यवस्थादेखील केली होती. वरुण धवनला हा पुरस्कार हल्लीच राजकारणात उतरलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details