महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

माधुरीने सांगितले वरूणचे बालपणातील मजेदार किस्से - alia bhatt

वरूण आपले वडिल डेविड धवन यांच्यासोबत एका डान्स शोच्या सेटवर यायचा. मात्र, तो एवढा मस्तीखोर होता की एका जागी बसणे त्याला आवडायचे नाही

माधुरीने सांगितले वरूणचे बालपणातील मजेदार किस्से

By

Published : Apr 12, 2019, 12:32 PM IST

मुंबई- अभिनेता वरूण धवन आणि माधुरी दीक्षित लवकरच 'कलंक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रमोशनसाठी वरूण, आलिया, आदित्य रॉय कपूर आणि माधुरी एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. यावेळी माधुरीला वरूणच्या लहानपणीच्या काही आठवणी विचारण्यात आल्या.

यावर माधुरीने सांगितले की, वरूण आपले वडिल डेविड धवन यांच्यासोबत एका डान्स शोच्या सेटवर यायचा. मात्र, तो एवढा मस्तीखोर होता की एका जागी बसणे त्याला आवडायचे नाही. त्यामुळे, त्याला शांत करण्यासाठी माधुरी त्याला डान्स करायला सांगायची.

वरूण उत्तम डान्स करतो असे डेविड धवननेच आपल्याला सांगितले होते, असेही माधुरीने म्हटले. माधुरी हे सांगत असतानाचा आलिया म्हणते, की तो अजूनही तसाच आहे. दरम्यान 'कलंक' चित्रपट १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details