वरुण धवन आगामी 'कुली नंबर १' मध्ये हमालाची भूमिका करताना दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग बँकॉकमध्ये सुरू आहे. वरुणने एक व्हिडिओ शेअर केला असून यात तो मजा मस्ती करताना दिसत आहे.
या व्हिडिओत वरुण सांगतो की तो साऊथ चीनच्या समुद्रात शूटींग करीत आहे. या चित्रपटात आपले नाव कुंवर महेंद्र प्रताप असल्याचेही तो सांगतो. त्यानंतर तो आपल्या बोटातील अंगठी दाखवतो व या नकली असल्याचेही सांगतो. या व्हिडिओत तो बऱ्याच फेका फेकी करताना दिसतो.
या व्हिडिओत तो बोटीला लटकतो. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, "कुंवर महेंद्र प्रताप. समुद्राच्या मधोमध जवळपास पडलाच होता.''