मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता वरूण धवन आणि नताशा दलाल यांच्या नात्याविषयीच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. मात्र, वरूण आणि डेविड धवननं या चर्चांना बहुतेकदा अफवा म्हटलं आहे. पण यानंतरही या कपलच्या रिलेशनशिप विषयीच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येत असतात.
वरुण-नताशाच्या लग्नामुळे 'स्ट्रीट डान्सर'ची रिलीज डेट बदलली? - wedding
वरूण आणि नताशा येत्या डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. वरूणच्या आगामी 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटाची तारीख अचानक पुढे ढकलण्यात आली.
![वरुण-नताशाच्या लग्नामुळे 'स्ट्रीट डान्सर'ची रिलीज डेट बदलली?](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3647210-thumbnail-3x2-varun.jpg)
अशात आता वरूण आणि नताशा येत्या डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. वरूणच्या आगामी 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटाची तारीख अचानक पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट आता जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागचे कारण वरूण आणि नताशाचे लग्नच असल्याचे म्हटले जात आहे.
चित्रपटाचं चित्रीकरणही वेळेत होत आहे, तर पोस्ट प्रोडक्शन आणि इतर कामही वेळतच पूर्ण होणार असताना केवळ जानेवारीतील प्रदर्शन चित्रपटासाठी फायद्याचं असल्यानं हा निर्णय घेतल्याचं वरूण आणि भूषण कुमार यांनी म्हटलं होतं. यावरूनच डिसेंबरमध्ये वरूण-नताशा विवाहबंधनात अडकणार असल्याचा अंदाज अनेक माध्यमांनी वर्तवला आहे. अशात आता हे कपल स्वतः याबद्दलची अधिकृत घोषण कधी करणार याकडेच वरूणच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.