मुंबई - वाणी कपूरने तिच्या आगामी ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू केल्याने तिला आनंद झाला असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. "मी, प्रामाणिकपणे सांगते, की दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू झाल्याने खूप आनंदी आहे. नक्कीच, अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि सर्व प्रतिबंधात्मक उपाय लक्षात ठेवणे आवश्यक आहे. परंतु नवीन प्रवास करण्यासाठी उत्साही वाटते!" असे वाणी म्हणाली.
चित्रपटाचे मुख्य कलाकार अक्षय कुमार आणि निर्मात्यांनी चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते स्कॉटलंडमध्ये चित्रित केले जाईल. खिलाडी स्टारबरोबर पहिल्यांदा काम करताना वाणी म्हणाली: "ठीक आहे, ही माझ्यासाठी एक उत्तम संधी आहे! मला अक्षय सरांचा खूप आदर आहे. मी खूप उत्साही आहे आणि मी खरोखर अनुभवाची वाट पाहत आहे." अभिनेता अक्षय कुमार पहिल्यांदा स्कॉटलंडमध्ये शूटिंग करणार आहे. शूटच्या ठिकाणाची माहिती न देता वाणीने सांगितले, की कोरोनाची साथ असतानाही तिच्या आठवणी बनवणार आहे.