मुंबई- अभिनेत्री वाणी कपूर आगामी ‘बेलबॉटम’ चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. याच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होत आहे. यासाठी वाणी स्कॉटलंडला रवाना झाली आहे. ती सेटवर परत येण्याची उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट पाहत आहे.
वाणी म्हणाली, "मी खरोखरच चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करत आहे यावर माझा विश्वास नाही! सेटवर परत येणे हा एक क्षण आहे. ज्याची मी बरीच प्रतीक्षा करत होते आणि आता ती वेळ शेवटी आली आहे.
५ महिन्यांनंतर मी मुंबईतून बाहेर जात आहे. "
कोरोना साथीच्या आजारामुळे अडचणीत सापडलेला हा उद्योग पुन्हा एकदा सुरू झाल्याने अभिनेत्रीला आनंद झाला आहे.
ती पुढे म्हणाली, "हे वर्ष आपल्या सर्वांसाठी एक कठीण परीक्षा होती. परंतु मला आनंद आहे की, हळू हळू आपण न्यू नॉर्मलकडे वाटचाल सुरू करीत आहेत.''
अक्षयसोबत शूटिंगबद्दल बोलताना ती म्हणाली, "मी प्रथमच अक्षय सरांसोबत काम करत आहे आणि मला हे माहित आहे की हे विशेष असेल, मी त्याच्याकडून बरेच काही शिकू शकेन. ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. आशा आहे की लोकांना आमची जोडी आवडेल. "
'बेल बॉटम' मध्ये हुमा कुरेशी आणि लारा दत्ता देखील आहेत.
वाणीकडे 'बेलबॉटम' व्यतिरिक्त आणखी 2 चित्रपट आहेत. 'शमशेरा'मध्ये रणबीर कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. दुसरा चित्रपट अभिषेक कपूर यांचा अयुष्मान खुराना अभिनीत अनटायल्ड फिल्म आहे.