मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद चांगलाच चर्चेत आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना बस आणि आणि विमानाच्या माध्यमातून त्यांच्या घरी पोहोचवले. सोनू सूदने आतापर्यंत हजारो लोकांना त्यांच्या घरी पोहोचवले आहे. त्यामुळे सोनू सूदचे देशभरात कौतुक होत आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना चार्टर्ड प्लेनद्वारे परत उत्तराखंडला पाठवल्याबद्दल शनिवारी सोनू सूदचे आभार मानले. तसेच कोरोनाचे संकट संपल्यानंतर राज्यात आमंत्रित केले. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सोनू सूदसोबत फोनवरून बातचित केली.
त्रिवेंद्र सिंह रावत यांनी त्यांच्या ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की फिल्म अभिनेता सोनू सूद यांनी केलेल्या मदतीब त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्यासोबत आज फोनवरून बातचीत केली. सोनू सूद आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी खूप चांगले काम केले. त्यांनी दुसर्या राज्यात अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या स्वगावी, स्वराज्यात परतण्यासाठी मदत केली आहे.
दरम्यान रावत यांच्याशी बातचीत केल्यानंतर सोनू सूदने देखील ट्विट केले. सोनूने लिहिले की मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी केलेल्या कौतुकाने त्यांना अधिक काम करण्यास अधिक बळ मिळाले आहेत. सोनुने म्हणतो की तुमच्याशी बोलून खूप चांगले वाटले. मी लवकरच बद्रीनाथ आणि केदारनाथच्या दर्शनासाठी उत्तराखंडला येईल आणि तुमची भेट घेईल.
लॉकडाऊनमध्ये सोनू सूदने हजारो मजुरांना बस आणि विमानाद्वारे त्यांच्या घरी पाठवून चाहत्यांची आणि देशभरातील लोकांची मनं जिंकली आहेत.