महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

"परीसारख्या सुंदर मुलीला तुम्ही भूतनी म्हणता...लाज वाटत नाही" - Urvashi Rautela in Pagalpanti

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने केलेले एक ट्विट खूप गाजतंय. तिने ट्विटमध्ये लिहिलंय, परीसारख्या सुंदर मुलीला तुम्ही भूतनी म्हणता...लाज वाटत नाही भूतनीच्यानो. यावर खूप प्रतिक्रिया येत आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला

By

Published : Oct 18, 2019, 11:06 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या तिने केलेले एक ट्विट खूप गाजतंय. सध्या ती पागलपंती या सिनेमात काम करीत आहे. तिने ट्विटमध्ये लिहिलंय, ''परीसारख्या सुंदर मुलीला तुम्ही भूतनी म्हणता...लाज वाटत नाही भूतनीच्यानो.'' यावर खूप प्रतिक्रिया येत आहे.'

उर्वशीने केलेले हे ट्विट पागलपंतीचा डायलॉग असण्याची शक्यताही काहीजण बोलून दाखवत आहेत. सध्या तिचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालंय. अलिकडेच तिने गायक टोनी कक्कड यांच्या 'बिजली की तार' या गाण्यावर डान्स केला होता. या गाण्याने युट्यूबवर धमाल केली होती.

'सिंह साब दी ग्रेट' या चित्रपटातून उर्वशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती एक उत्तम डान्सर आणि मॉडेल आहे. १५ वर्षाची असताना तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. पागलपंती चित्रपटातून ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करायला आली आहे. या उर्वशी रौतेलासह चित्रपटात जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूज, कृति खरबंदा, अरशद वारसी, अनिल कपूर आणि पुलकित सम्राट यांच्या भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details