मुंबई- गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या सुरूवातीपासूनच योगगुरू बाबा रामदेव आपली औषधे आणि योगाच्या जोरावर लोकांना निरोगी बनवल्याचा दावा करत आहेत. इथंपर्यंत ठीक होते, पण रामदेव यांनी अॅलोपॅथीला 'मूर्खांचे विज्ञान' असे वर्णन केल्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. या विधानामुळे कोरोनाविरूद्ध युद्ध लढणार्या डॉक्टरांमध्ये प्रचंड निराशा निर्माण झाली. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करून बाबा रामदेव यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करुन लिहिलं आहे की, 'या बिझनेसमनने कोविड रुग्णालयात जायला हवे, तिथे आमच्या डॉक्टरांसमवेत २४ तास उभे राहावे आणि मग त्यांनी हे विधान करावे. हे सर्वात अमानुष, संतापजनक आणि द्वेषपूर्ण विधान होते. हे कोणाचे टूलकिट आहे? इतकी हिम्मत कशी झाली? उर्मिलाच्या ट्विटवर सातत्याने कमेंट्स येत आहेत. एका वापरकर्त्याने टिप्पणी करताना लिहिले, 'उर्मिला जी तुम्ही बरोबर आहात. हा भोंदू बाबा आहे.'