मुंबई- कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात बॉलिवूड कलाकारही चित्रपटांचं चित्रीकरण बंद असल्यानं घरीच वेळ घालवत आहेत. यादरम्यान सतत आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहाण्यासाठी कलाकार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करत आहेत.
उर्मिलानं फोटो शेअर करत चाहत्यांना केलं घरी राहाण्याचं आवाहन
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनंही इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यात ती खुर्चीवर बसून मोकळ्या हवेचा आनंद घेताना दिसत आहे. फोटोवर अभिनेत्रीनं एक स्टिकर लावलं आहे, ज्यावर लिहिलं आहे, की घरीच राहा.
याच माध्यमातून कलाकार आपल्या चाहत्यांमध्ये कोरोनाविषयी जनजागृतीही करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनंही इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यात ती खुर्चीवर बसून मोकळ्या हवेचा आनंद घेताना दिसत आहे. फोटोवर अभिनेत्रीनं एक स्टिकर लावलं आहे, ज्यावर लिहिलं आहे, की घरीच राहा.
चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, उर्मिला 2018 मध्ये आलेल्या ब्लॅकमेल सिनेमातील एका गाण्यात शेवटचं झळकली होती. अभिनय देवनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात इरफान खान, किर्ती कुल्हारी, अरुणोदय सिंह आणि दिव्या दत्ता हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.