मुंबई- आज देशभरात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या खास दिवशी अनेक कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं लिहिलेल्या पोस्टनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
प्रार्थना करते, सर्व काश्मीरींची छळातून सुटका होवो; उर्मिलानं दिल्या ईदच्या शुभेच्छा - मधुर भांडारकर
मी काश्मीरमधील सर्व लोकांसाठी प्रार्थना करेल, की ते लवकरच या छळातून आणि अंधकारातून बाहेर येवो. असं म्हणत उर्मिलाने सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उर्मिलानं आपल्या इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं म्हटलं आहे, मागच्या वर्षी ईदच्या दिवशी मी काश्मीरमध्ये होते. ती ईद अतिशय आनंदाची आणि सुसंस्कृत होती. मात्र, आता गेल्या एक आठवड्यापासून मी माझ्या सासरकडच्या लोकांसोबत बोलू शकले नाही. ते मधुमेह आणि रक्तदाबासारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत.
मी काश्मीरमधील सर्व लोकांसाठी प्रार्थना करेल, की ते लवकरच या छळातून आणि अंधकारातून बाहेर येवो. असं म्हणत उर्मिलाने सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर तिच्याशिवाय अनुपम खेर, हुमा खुरेशी, रितेश देशमुख, अजय देवगण, मधुर भांडारकर आणि ऋषी कपूर यांनीही चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.