महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पुन्हा एकदा रिलीज होणार ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक', जाणून घ्या कारण - देवेंद्र फडणवीस

‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी महाराष्ट्रात पुन्हा रिलीज करण्यात येणार आहे. कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे.

उरी: द सर्जिकल स्ट्राइक

By

Published : Jul 25, 2019, 1:42 PM IST

मुंबई- ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट येत्या २६ जुलैला पुन्हा प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रात ५०० ठिकाणी हा चित्रपट दाखवला जाईल. हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचे कारण म्हणजे येत्या २६ जुलैला कारगिल विजय दिवस असतो. युध्दात वीरमरण आलेल्या जवानांचे स्मरण रहावे यासाठी हा दिवस पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाचे पुन्हा प्रदर्शन होणार आहे.

‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट ११ जानेवारीला रिलीज झाला होता. उरी येथील सैनिकांच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात १७ भारतीय सैनिक मारले गेले होते. त्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळावर हल्ला करीत उरी हल्ल्याचा बदला घेतला होता. उरी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांचे स्मरण या दिवशी व्हावे म्हणून ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक' पुन्हा रिलीज करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. याला निर्माता रॉनी स्कूवाला यांनी प्रतिसाद दिल्याचे सूत्रांकडून समजते.

‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धार यांनी केले आहे. विकी कौशल याने भारतीय सैन्याच्या मेजरची भूमिका साकारली आहे. ही व्यक्तीरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली होती. हा चित्रपट पाहून तरुणांमध्ये देशप्रेम आणि सैन्यात दाखल होण्याची जिद्द वाढेल असा हेतू चित्रपट पुर्नप्रदर्शित करण्यामागे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details