मुंबई- 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर विकी कौशलच्या लोकप्रियतेचा आलेख अधिक उंचावला. आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'उरी' चित्रपटाची संपूर्ण टीम आता पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. नुकतीच या चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
'उरी'ची टीम पुन्हा एकदा येणार एकत्र, ही असणार विकीची भूमिका - aditya dhar
महाभारतातील अश्वत्थामा या व्यक्तिरेखेवर या चित्रपटाची कथा आधारित असणार आहे. विकी कौशल यात अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे
महाभारतातील अश्वत्थामा या व्यक्तिरेखेवर या चित्रपटाची कथा आधारित असणार आहे. विकी कौशल यात अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली.
या चित्रपटाचे दिग्दर्शनही 'उरी'चे दिग्दर्शक आदित्य धर हेच करणार असून रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती असणार आहे. उरी आणि विकीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.