मुंबई - अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या आठवणींचे पुस्तक लिहून काढले आहे. 'अनफिनिश्ड' असे या पुस्तकाचे शीर्षक असेल. याचे लिखाण तिने पूर्ण केले असून, हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
'अनफिनिश्ड' या पुस्तकात प्रियंकाचे काही खासगी निबंध, कथा आणि निरीक्षणे वाचायला मिळतील. तसेच ती पेंग्विन रँडम हाऊस इंडिया हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.
प्रियंकाने पुस्तक पूर्ण झाल्याचे ट्विटरवरुन चाहत्यांना कळवले आहे. "अनफिन्श्ड काम फिनिश झाले! नुकतेच अंतिम हस्तलिखित पाठवले! हे सर्व आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. माझ्या आठवणीतील प्रत्येक शब्द माझ्या आयुष्यातील आत्मपरीक्षण आणि आयुष्याच्या प्रतिबिंबातून आला आहे. #लवकरच येत आहे," असे तिने लिहिले.
प्रियंकाने वयाच्या १७ व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आणि त्यानंतर ती मिस इंडिया बनली आणि त्याच्या पुढच्या वर्षी ती मिस वर्ल्ड ही स्पर्धाही जिंकली.
ऐतराज, बर्फी, ७ खून माफ आणि बाजीराव मस्तानी यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनय करण्याबरोबरच प्रियंकाने एबीसीच्या शो क्वांटिकोमध्ये अलेक्स परिश ही व्यक्तीरेखा साकारुन भूमिकेबद्दल प्रशंसा मिळवली आहे. तिने सेठ गोर्डनच्या अॅक्शन कॉमेडी बेवॉच या चित्रपटात व्हिक्टोरिया लीड्स या भूमिकेद्वारे हॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि जिम पार्सन आणि क्लेअर डेन्स यांची मुख्य भूमिका असलेल्या 'किड लाइक जेक'ने या चित्रपटातही ती झळकली होती.
टॉब स्ट्रॉस-शुल्सनच्या कॉमेडी इजंट इट रोमँटिकमध्येही प्रियांकाने सपोर्ट रोल केला होता, ज्यात रिबेल विल्सन यांनी अभिनय केला होता. गेल्या वर्षी ती शोनाली बोसची 'द स्काई इज पिंक' या सिनेमातून हिंदी सिनेमात परतली होती..
प्रियंकाच्या भावी प्रोजेक्टमध्ये नेटफ्लिक्ससोबत अरविंद अडीगाची व्यंगात्मक कादंबरी द व्हाइट टायगर, रॉबर्ट रॉड्रिग्जचा सुपरहिरो फिल्म वी कॅन बी हीरोज, थ्रिलर मालिका सिटीटाईल आणि मॅट्रिक्स-४ या कलाकृतीमध्ये तिची महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.