मुंबई- श्रद्धा कपूर आणि प्रभास यांच्या मुख्य भूमिका असलेला साहो हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अशात आता श्रद्धा आणि प्रभासच्या चाहत्यांसाठी खास असलेल्या या सिनेमाची आणखी दोन नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी हे फोटो शेअर केले आहेत.
'साहो'चं नवं पोस्टर, पाहा प्रभासचा खास लूक - सिनेमागृह
एका पोस्टरमध्ये अभिनेत्री मंदिरा बेदीचा साहोमधील लूक पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये प्रभासचा लूक पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये प्रभासचा अॅक्शन अवतार दिसत आहे.
यातील एका पोस्टरमध्ये अभिनेत्री मंदिरा बेदीचा साहोमधील लूक पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये प्रभासचा लूक पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये प्रभासचा अॅक्शन अवतार दिसत आहे. दरम्यान या सिनेमाचा ट्रेलर शनिवारी म्हणजेच १० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्ल्याळम अशा चार भाषांमध्ये हा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे. या ट्रेलरबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तर सुजित यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट येत्या ३० ऑगस्टला सिनेमागृह गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.