मुंबई- हिंदी सिनेमाचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (डीडीएलजी)' चित्रपटाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगाचे सेलेब्रिशन साजरे व्हावे यासाठी ट्विटरने एक विशेष इमोजी लॉन्च केला आहे. ट्विटर इंडियावर ही इमोजी एका काऊबेलची आहे, जी आपण चित्रपटात अनेकप्रसंगी पाहिली आहे. हा चित्रपटाच्या कथेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
'डीडीएलजी'च्या २५ व्या वर्षानिमित्त ट्विटरने लॉन्च केला खास 'इमोजी'!!
डीडीएलजी चित्रपटाला आज २५वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगाचे सेलेब्रिशन साजरे व्हावे यासाठी ट्विटरने एक विशेष इमोजी लॉन्च केला आहे. ट्विटर इंडियावर ही इमोजी एका काऊबेलची आहे.
डीडीएलजी चित्रपटाला आज २५
२० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झालेल्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात राज (शाहरुख खानची भूमिका साकारलेली) आणि सिमरन (काजोल) यांची प्रेमकथा दाखविण्यात आली होती. हा चित्रपट परदेशी स्थायिक झालेल्या एका भारतीय कुटुंबाभोवती विणलेला होता. रोमँटिक चित्रपट म्हणून डीडीएलजीच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत.