मुंबई - देशभर लॉकडाऊन सुरू असताना ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार मुंबईच्या निर्मनुष्य रस्त्यावरून जाताना दिसले. याचा एक व्हिडिओ ट्विंकल खन्नाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने पती अक्षयसोबत रुग्णालयात गेल्याचे सांगितले आहे.
तिच्या हाताला जखम झाली होती. त्यांची पोस्ट पाहून अनेकजण त्यांना प्रकृतीची विचारपूस करीत आहेत.
कारमधून बसून बनवलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ट्विंकलने लिहिलंय, 'हॉस्पिटलमधून येताना रस्ते निर्मनुष्य आहेत. कृपया चिंता करू नये.' एका इंग्रजी म्हणीचा दाखल देत तिने पुढे लिहिलंय, 'आय एम नॉट अबाउट टू किक द बकेट, मी खरंच कुणाला लाथ मारत नाही.'
या व्हिडिओत अक्षय कुमारने मास्क परिधान केलेला दिसत आहे. तर ट्विंकल कॉमेंट्री करताना दिसत आहे..