महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ट्विंकल म्हणते, तिचा 'माल' अक्षय 'जुन्या व्हिस्की'सारखा !! - ट्विंकल अक्षयला म्हणते माल

ट्विकल खन्नाने पुन्हा एकदा पती अक्षय कुमारची मजेशीर खिल्ली उडवली आहे. तिने एक सुट्टीतील अक्षयचा फोटो शेअर केला आहे. यात तो पांढऱ्या दाढीसह दिसतोय. तो म्हातारा होतोय हे सांगताना ट्विंकलने फोटो पोस्टमध्ये लिहिले की, "आमचा माल जळलेल्या लाकडाच्या बॅरलमधील जुन्या व्हिस्कीसारखा वाटत आहे."

अक्षय आणि ट्विंकल
अक्षय आणि ट्विंकल

By

Published : Jan 28, 2022, 1:01 PM IST

Updated : Jan 28, 2022, 1:24 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - लेखिका ट्विंकल खन्ना तिचा नवरा अक्षय कुमारच्या लूकमुळे काळजीत पडली आहे. गुरुवारी ट्विंकलने इंस्टाग्रामवर त्यांच्या सुट्टीतील एक फोटो शेअर केला आहे.

ट्विंकलने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेता अक्षय कुमार पांढऱ्या दाढीसह दिसत आहे. फोटो शेअर करताना ट्विंकलने लिहिले की, "आमचा माल जळलेल्या लाकडाच्या बॅरलमधील जुन्या व्हिस्कीसारखा वाटत आहे. तुम्ही सहमत आहात का?"

ट्विंकल खन्नाची मजेशीर पोस्ट

अक्षय आणि ट्विंकलने 17 जानेवारी रोजी वैवाहिक आनंदाची 21 वर्षे साजरी केली. या प्रसंगी ट्विंकलने करण जोहर, ताहिरा कश्यप, सुझान खान, अभिषेक कपूर आणि इतर अनेक सेलिब्रेटी यांसारख्या सेलिब्रिटीजसाठी विनोदाने लिहिलेली पोस्ट शेअर केली होती.

अक्षयसोबत एक काल्पनिक संभाषण शेअर करत ट्विंकलने लिहिले, 'आमच्या 21 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आमच्यात संभाषण झाले...... मी: ''तुला माहिती आहे, आपण इतके वेगळे आहोत की आम्ही जर एखाद्या पार्टीत भेटलो तर मला माहिती नाही की तुझ्याशी बोलू शकेन की नाही.'' तो : मी तुझ्यासोबत नक्की बोलेन.मी : मला आश्चर्य का वाटत नाही, मग असे काय आहे? तू मला विचारशील का? तो : नाही.. तसे नाही, मी म्हणेन, 'भाभी जी, भाई साहब कैसे हैं, बच्चे ठीक हैं? ठीक है नमस्ते'."

वर्क फ्रंटवर अक्षय कुमार शेवटचा रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' आणि आनंद एल रायच्या 'अतरंगी रे'मध्ये दिसला होता. 'बच्चन पांडे', 'राम सेतू' आणि 'पृथ्वीराज' यांच्यासह अनेक चित्रपट त्याच्या हातात आहेत.

हेही वाचा -दीपिका, सारा, इशान, जान्हवीसह मनीष मल्होत्राच्या पार्टीतील फोटो

Last Updated : Jan 28, 2022, 1:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details