मुंबई- अक्षय कुमारची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर हृतिक रोशनचे कौतुक केले आहे. गरजू लोकांना मदत करणे आणि कोविड संकटाच्या या काळात मदतीसाठी ह्रतिकने घेतलेल्या पुढाकारबद्दल ट्विंकल प्रभावित झाली आहे.
बुधवारी ट्विंकलने इंस्टाग्रामवर हृतिकचा एक फोटो शेअर केला असून त्यासोबत तिने लिहिले आहे की, “माझा शेजारी सर्व प्रकारची मदत करीत आहे. कोरोनाच्या या संकट काळात माझा शेजारी सर्व पध्दतीने मदत करीत आहे. ह्रतिक रोशन कौतुकास पात्र आहे."
यापूर्वी ट्विंकल खन्ना स्कॉटिश अभिनेता जेम्स मॅकाव्हॉय याचेही कौतुक केले होते. भारतात सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना मदत करण्याचे आवाहन जेम्स मॅकाव्हॉय याने आपल्या चाहत्यांना केले होते. भारतात कोविड नियंत्रणासाठी काम करणाऱ्या संस्थांना निधी देण्याचे आवाहनही त्याने केले होते.
दरम्यान, ट्विंकल आणि तिचा नवरा सुपरस्टार अक्षय कुमार यांनी कोविड विरुध्दच्या लढाईसाठी १०० ऑक्सिजन केंद्रे दान केली आहेत.
हेही वाचा - तारक मेहता...'मधील 'टप्पू'च्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू