मुंबई - लेखिका-निर्माती आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने गुरुवारी इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला. ज्यामध्ये ती कोचवर पेंगताना दिसत आहे. तिने शेअर केलेला फोटो तिचा मुलगा आरवने घेतला आहे.
"माझा मुलगा घाईघाईने आला आणि आज हा फोटो काढला. माझी लहानगी मुलगी आणि मी एकत्र अभ्यास करीत होतो आणि वाचन करणार होतो. माझ्या हातात पेन्सिल असतानाच मला डुलकी आली. दररोज दुपारी ४ च्या सुमारास माझ्याबाबतीत असेच घडते. #आय विलगेट यू फॉर धिस भाटिया बॉय," असं तिनं लिहिलं आहे.
फोटोमध्ये ट्विंकलसह तिची मुलगी नितारा पुस्तक वाचताना दिसत आहे.