मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आतापर्यंत अनेक महिला केंद्रीत चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानंतर आता नुकताच तापसीनं आणखी एक नवा चित्रपट साईन केला आहे. तिनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही दिवसांपूर्वीच याबद्दलची माहिती दिली होती.
तापसीला अभिनय येत नाही, ट्रोलरच्या ट्विटवर तापसीचं सणसणीत उत्तर - epic reply
आर्टिकल १५ चे दिग्दर्शक अनुभव सिन्हा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून सिनेमाचं शीर्षक अद्याप निश्चित झालं नाही. दरम्यान तापसीच्या या ट्विटवर रिप्लाय करत एका यूजरने अनुभव सिन्हा सर तापसीच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला साईन करा, तिला अभिनय येत नाही, असं म्हटलं आहे.

तापसीनंही ट्रोलरच्या या ट्विटला सणसणीत उत्तर दिलं आहे. सॉरी यार, पण आता तर सगळं साईन करून झालं आहे. आता तर सरांना मीच या चित्रपटातून काढू देणार नाही. पण तू एक काम कर, आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मला साईन करण्यापासून थांबव, कदाचित लवकरच मी आणखी एक चित्रपट लॉक करण्याच्या तयारीत आहे, असं तापसीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.