आपल्या पितृसत्ताक पद्धतीत सामाजिक अडथळे निर्माण करणारी मानवी श्वापदे वावरत असतात, विद्या ज्या विभागात कार्यरत असते, तिथली उदासीनताच तिला जोशाने स्वत:ची धमक सिद्ध करण्याची ऊर्जा देते. सिनेमाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. आपली चाकोरी बाहेरची नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो.
‘शेरनी’ या चित्रपटात विद्या बालन यात एका प्रामाणिक महिला वन अधिकारी- विद्याची भूमिका साकारत आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओने नुकतेच विद्या बालन अभिनीत चित्रपट ‘शेरनी’च्या बहुप्रतीक्षित ट्रेलरचे अनावरण केले. ट्रेलरला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळत असून प्रदर्शित झाल्याच्या काही तासातच अनेक महिला वन अधिकाऱ्यांनीदेखील सोशल मीडियावर आपले विचार व्यक्त केले.
या चित्रपटासाठी आणि या रोमांचक ट्रेलरसाठी विद्याला जे प्रेम मिळते आहे ते अलौकिक आहे. काही वन अधिकाऱ्यांनी या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना विद्या बालनच्या अनोख्या भूमिकेमुळे आणि असामान्य कथेमुळे खूप प्रभावित झाल्याचे म्हटले आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया नेहमीच एका अभिनेत्यासाठी महत्त्वपूर्ण असतात मात्र, वास्तविक आयुष्यातील वन अधिकाऱ्यांनी केलेले कौतुक, ज्या लोकांवर हा चित्रपट चित्रित आहे, विद्या बालनसाठी हा अवर्णनीय क्षण आहे. ट्रेलरने काही खऱ्याखुऱ्या वन अधिकाऱ्यांच्या मनात घर केले आहे.