महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

VIDEO: अंगावर रोमांच उभे करणारा बहुप्रतीक्षित 'सेक्शन ३७५' चा ट्रेलर - Trailer of Section 375 out today

'सेक्शन ३७५' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात अक्षय खन्ना आणि रिचा चढ्ढा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अजय बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय. १३ सप्टेंबर रोजी 'सेक्शन ३७५' रिलीज होणार आहे.

'सेक्शन ३७५' चा ट्रेलर

By

Published : Aug 13, 2019, 5:39 PM IST

मुंबई - बहुप्रतीक्षित 'सेक्शन ३७५' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अक्षय खन्ना खूप दिवसानंतर एका आक्रमक वकिलाच्या भूमिकेत झळकला असून रिचा चढ्ढाने पुन्हा एकदा दमदार भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केलाय. एका अत्यंत संवेदनशील विषयाला या चित्रपटाने हात घातलाय.

सेक्शन ३७५ हे स्त्रीवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे. घटनेच्या या कलमामध्ये अत्याचार करणाऱ्या विरुध्द शिक्षेची तरतूद असली तरी यात अनेक पळवाटा आहेत. याचाच उपयोग आरोपींचे वकिल करतात आणि आरोपी आरामात सुटतो. अशाच एका बेरकी वकिलाची भूमिका अक्षयने साकारली आहे.

अभिनेत्री रिचा चढ्डा अत्याचार झालेल्या मुलीची वकिल यात दाखवण्यात आलीय. केवळ तांत्रिक आधारावर केस लढवली जात असल्याचा आरोप ती करते. कोणत्याही सबळ पुराव्या अभावी आरोपीचे वकिल लढत असल्याचा युक्तीवादही ती करते. अखेर या केसचा निकाल काय लागतो याबद्दलची उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर आहे.

'सेक्शन ३७५' चित्रपटात अक्षय खन्ना, रिचा चढ्ढा, मीरा चोप्रा, आणि राहुल भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अजय बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय. १३ सप्टेंबर रोजी 'सेक्शन ३७५' रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details